---Advertisement---

‘भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यास युद्ध अपरिहार्य’ – पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांची धमकी

On: December 12, 2025 8:56 AM
Follow Us:
---Advertisement---

भारत-पाकिस्तान तणाव वाढत असताना पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी सिंधू पाणी करार रद्द झाल्यास युद्ध होण्याची पोकळ धमकी दिली. भारतीय लष्करप्रमुखांनीही युद्धाची शक्यता व्यक्त केली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव वाढलेला आहे. यामध्ये आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे.
भुट्टो यांनी म्हटलं की, “भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते.”

ही विधाने त्यांनी हजरत शाह अब्दुल लतीफ भिट्टाई यांच्या 282 व्या उरूस कार्यक्रमात केली.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. भारताने सिंधू पाणी करार थांबवला असून त्यामुळे पाकिस्तानातील शेती धोक्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानकडून पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.

भारताची प्रत्युत्तर कारवाई:
7 मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आणि 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर पाकिस्तान हादरला. त्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांनी युद्धबंदीचा निर्णय घेतला.

भारतीय लष्करप्रमुखांची प्रतिक्रिया:
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अलीकडेच युद्धाची शक्यता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “ज्या युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे, ते लवकरच होऊ शकते. आपल्याला तयार राहावं लागेल.”
त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं आणि त्यामुळे ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगितलं. या ऑपरेशनने संपूर्ण देशाला एकत्र केलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment